
किल्लेधारूर : खामगाव-पंढरपूर पालखी महामार्ग विविध कारणांनी सातत्याने चर्चेत आहे. मागील आठवड्यांत या रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे झालेल्या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला होता. शिवाय याच मार्गावर तेलगाव येथे पावसाचे पाणी साचते आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.