Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून गावाकडे जाताना पारध-वालसावंगी रस्त्यावर रात्री एक क्रेटा कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला.
Creta Car Falls into Well

Creta Car Falls into Well

sakal

Updated on

पारध - नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून धावडा गावाकडे जाताना पारध-वालसावंगी रस्त्यावर पद्मावती गावाजवळ शुक्रवारी (ता. 8) रात्री एक क्रेटा कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आईचा मृत्यू तर मुलावर सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचार सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर एक महिला अद्याप कारमध्ये अडकून असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com