Creta Car Accident
sakal
पारध - दुचाकीस्वाराला धडक देऊन घटनास्थळावरून सुसाट वेगाने पळून जाण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळलेली क्रेटा कार तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने शनिवारी (ता. 8) बाहेर काढण्यात आली. या भीषण दुर्घटनेत कारमध्ये अडकलेल्या अक्तर बेगम अमन उल्ला खान (वय-75) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुलतानाबी बेगम (वय-46) यांचा बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता. ७) भोकरदन तालुक्यातील पारध- वालसावंगी मुख्य रस्त्यावर पद्मावती गावाजवळ घडली.
Creta Car Accident
sakal