बीडमधील गुन्हेगारी थांबेना, छातीवर दगड घालून तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

कानडी बुद्रूक येथील संजय सुखदेव वलवळे (वय ३५) याचे गावातीलच रामेश्वर घुले याच्याशी सोमवारी (ता. आठ) सायंकाळी फोनवर बोलणे झाले होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास गावातीलच आरोपी संजय याच्या घरी आले.

आष्टी (जि. बीड) - बहिणीची वर्तणूक चांगली नसल्याची खोटी माहिती फोनवरून पतीला का दिली? असे म्हणून तरुणास बेदम मारहाण करून त्याच्या छातीवर दगड मारल्याने तो जागीच गतप्राण झाला. तालुक्यातील कानडी बुद्रूक येथे मंगळवारी (ता. नऊ) घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तालुका सरहद्दीवर असलेल्या कानडी बुद्रूक येथील संजय सुखदेव वलवळे (वय ३५) याचे गावातीलच रामेश्वर घुले याच्याशी सोमवारी (ता. आठ) सायंकाळी फोनवर बोलणे झाले होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास गावातीलच आरोपी संजय याच्या घरी आले. त्यांनी तू आमच्या बहिणीची वर्तणूक चांगली नसल्याची खोटी माहिती तिच्या पतीला का दिलीस? असे म्हणून संजयला बेदम मारहाण सुरू केली.

हेही वाचा - गेवराईतील तो स्फोट डॉक्टरनेच घडविला

मारहाणीत छातीवर दगड अथवा वीट लागल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कानडी परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक विजय लगारे यांनी कानडी बुद्रूक येथे भेट दिली. यानंतर तरुणाचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime in Beed will not stop, murder of a young man by throwing a stone at his chest

Tags
टॉपिकस
Topic Tags: