धक्कादायक : गेवराईतील ‘तो’ स्फोट डॉक्टरनेच घडवून आणला..!

वैजिनाथ जाधव
Tuesday, 9 June 2020

गेवराई पासून नजीक असलेल्या बागपिंपळगाव येथे तलवाडा फाट्यावर डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री मेडिकलला लागलेल्या आगीत चोरमले यांचा मृत्यू झाला होता. मयत डॉक्टर व मेडिकल चालकाचा देवाण-घेवाणी वरून जुना वाद होता. त्या रागातून मी व डॉक्टरने आपला सहकारी असलेल्या सुनील याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले, डॉक्टर ने आधीच मेडिकलची एक बनावट चावी बनवून घेतली होती.

गेवराई (बीड) : तालुक्यातील बागपिंपळगाव कॅम्प तलवाडा फाटा येथील मेडिकलला आग लागून डॉक्टर मयत झाल्याची घटना रविवार (ता.सात) मध्य रात्री घडली होती. या घटनेत डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. मात्र मयत डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय ३५) यांनीच हा स्फोट घडवून आणल्याचा जवाब सोबत जखमी असलेल्या सुनील माळी याने दिल्यामुळे पोलिसांनी मयत डॉ. भाऊसाहेब चोरमले व गंभीर जखमी असलेल्या सुनील माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   
गेवराई पासून नजीक असलेल्या बागपिंपळगाव येथे तलवाडा फाट्यावर डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री मेडिकलला लागलेल्या आगीत चोरमले यांचा मृत्यू झाला होता. मयत डॉक्टर व मेडिकल चालकाचा देवाण-घेवाणी वरून जुना वाद होता. त्या रागातून मी व डॉक्टरने आपला सहकारी असलेल्या सुनील याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले, डॉक्टर ने आधीच मेडिकलची एक बनावट चावी बनवून घेतली होती.

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

त्याच चावीने डॉक्टरने मेडिकलचे शटर उघडले व ते आत गेले आणि काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर पंधरा फूट लांब फेकले गेले तर बाहेर उभा असलेला सुनील माळी जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला मात्र, तपासामध्ये पोलीसांना काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्या होत्या.

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

डॉक्टर इतक्या रात्री मेडिकलमध्ये कशाला गेले? हा प्रश्न पोलिसांना पडला. तेव्हा त्यांनी जखमी कंपाउंडर कडे या प्रकरणाची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून विचारपूस सुरू केल्यानंतर कंपाउंडर ने घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली.

दुभत्या गायी आणायच्या कशा ?  

मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर असावे असाही कयास लावला जात असून फ्रिज व सॅनिटायझरने पेट घेतल्यामुळे स्फोट झाला व डॉक्टर बाहेर फेकले गेले असावे अशी शक्यताही वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि राजाराम तडवी करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking The he blast in Gevrai was caused by a doctor