वसमतमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र पळवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news chain snatching Wasmat  Mangalsutra of woman snatch

वसमतमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र पळवले

वसमत (जि. हिंगोली ) :वसमत येथे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महिला दुचाकीवर आलेल्या दोघांनी खाली पाडून त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ता. १३ रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील चौधरी नगर भागातील रहिवासी असलेल्या सुशीला अशोक अवधूता ह्या शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी मालेगाव रोड भागात गेल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परत येत असताना त्या एकट्या असल्याचा गैरफायदा घेत एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला.

या प्रकारामुळे अवधूता यांना संशय आल्यामुळे त्यांनी पायी चालण्याचा वेग वाढवला. मात्र दुचाकीवरील दोघांनी कौठेकर यांच्या घराजवळ निर्मनुष्य रस्ता पाहून अवधुता यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. या प्रकारामुळे घाबरलेल्या सुशीला अवधुता यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत दुचाकीवरील चोरटे फरार झाले.

या प्रकाराची माहिती त्यांनी वसमत शहर पोलिस ठाण्याला दिली. वसमत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक महिपाळे, जमादार भगीरथ सवंडकर, चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर रात्री उशिरा सुशीला अवधुता यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक महिपाळे, जमादार भगीरथ सवंडकर पुढील तपास करीत आहेत.

- पंजाब नवघरे

Web Title: Crime News Chain Snatching Wasmat Mangalsutra Of Woman Snatch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top