
जिंतूर (जिल्हा परभणी) : शहरासह तालुक्यात मंगळवारी (ता. २३) पहाटे साडेचारपासूनच वारा व मेघगर्जनेसह सुरु झाला. त्यानंतच्या ढगाळ वातावरणामुळे दुपारी बारापर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. वारा व पावसामुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे भिजून नुकसान झाले.
गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात रात्रीच्यावेळी पाऊस पडत आहे. यावेळी वीजांचा लखलखाट, मेघगर्जनेसह जोराचे वारे वहात आहे.
मंगळवारी पहाटे साडेचार ते पाचपर्यंत हलक्या पावसाचा सडका झाला. त्यानंतरही अडीचतीन तास पावसाची टिपटीप सुरुच राहून ढगाळ वातावरणामुळे दुपारपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी तीनपर्यंत तरी ढगाळ वातावरण राहून हलके वारे वाहत होते.
पिकांवरील संकट कांही टळेना :
तालुक्यात ऑक्टोबर २०२० झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या तालुक्यात गहू, ज्वारी, हरभरा यासह रब्बी पिकांची काढणी सुरु असून बहुतेक ठिकाणी खळे सुरु आहे. वारा व पावसामुळे काढणीस आलेल्या ज्वारी, गहू या उभ्या पिकांसह खळ्यासाठी कापणी करुन ठेवलेल्या अनेक गावशिवारातील पिकांचे तसेच संत्रा, मोसंबी, आंबा व इतर फळबागांचे व भाजीपाल्याचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात या अस्मानी संकटाने भर पडली.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.