esakal | आर्थिक मंदीचा स्टील इंडस्ट्रीला फटका 
sakal

बोलून बातमी शोधा

STELL INDUSTRY

जालना :  गेल्या दीड वर्षात जालना औद्योगिक क्षेत्रातील 51 पैकी 31 कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. स्टील उद्योगाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या जालना शहरातील स्टील कंपन्यांना मागील दीड वर्षात घरघर लागली आहे.

आर्थिक मंदीचा स्टील इंडस्ट्रीला फटका 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना :  गेल्या दीड वर्षात जालना औद्योगिक क्षेत्रातील 51 पैकी 31 कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. 
स्टील उद्योगाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या जालना शहरातील स्टील कंपन्यांना मागील दीड वर्षात घरघर लागली असून, आर्थिक मंदीमुळे स्टील कंपन्यांवर आधारलेल्या क्षेत्रांनी उत्पादन क्षमता कमी केल्यामुळे स्टील कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षात तोट्यात सुरू असलेल्या 31 कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याची माहिती रूपम स्टील कंपनीचे मालक किशोर अग्रवाल यांनी दिली. 


सध्या सुरू असलेल्या वीस कंपन्यांनी आपले उत्पादन घटवले असून त्यापैकी चार ते पाच कंपन्या दोन तर उर्वरित एका शिफ्टमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्या बंद पडल्यामुळे महिन्याकाठी जवळपास आठ कोटींची उलाढाल कमी झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपन्यांनी एक किंवा दोन शिफ्ट सुरू ठेवल्यामुळे अनेकांच्या हातून रोजगार निसटला आहे. 

आर्थिक मंदीमुळे सळयांची मागणी घटली आहे. कच्चा माल खरेदी करताना खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पक्‍क्‍या मालासाठी अधिक किंमत मोजावी लागत असल्यामुळे अडचणी येत आहेत. उत्पादनाच्या तुलनेत मागणी घटल्याने अनेक कंपन्यांना टाळे लावावे लागले आहे. मागील तीन महिन्यांत पाच ते सात कंपन्या बंद पडल्या आहेत. 
- किशोर अग्रवाल, मालक, रूपम स्टील

loading image
go to top