gorakh gaikwad
sakal
कायगाव - छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावर गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळील राधिका पेट्रोल पंप परिसरात (दि. ६ नोव्हेंबर) रोजी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोरख रावसाहेब गायकवाड (वय ५२, रा. पुरी, ता. गंगापूर) यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. १३) दुपारी बारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.