रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून ‘ इतके ’ कोटी वसुल 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

0- सात महिण्याची कारवाई 
0- एक लाख सहा हजारांवर फुकटे प्रवाशी
o- फुकट्या प्रवाशांमध्ये घबराट
0- दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग सज्ज

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील विविध रेल्वेतून विनापरवाना प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुध्द अभियान राबवून एप्रील ते आॅक्टोबर- २०१९ या सात महिण्यात एक लाख सहा हजार ८०० प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून साडेचार कोटीचा महसुल जमा केला. गतवर्षी या काळात फुकटी प्रवासी संख्या कमी होती. मात्र या वर्षी यात वाढ होऊन ती साडेबारा टक्के वाढ झाली आहे. 

 

देश- विदेशातून हजारो भाविक नांदेडात
 
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून दररोज ९४ प्रवाशी रेल्वे धावतात. देशाच्या विविध भागात जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्याही या विभागातून धावतात. रेल्वेचे विभागीय कार्यालय येथे असल्याने प्रशासनाचे विभागीय व्यवस्थापक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. नांदेड येथे शिख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून सचखंड गुरुद्वारा आहे. या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी देश विदेशातून हजारो शिख भाविकासह अन्य धर्मिय या ठिकाणी दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे सचखंडला येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सचखंड एक्सप्रेस चालविल्या जाते. 

३४० तिकीट तपासणीकांच्या डोळ्यात धुळफेक

नागपूर, दिल्ली, बंगळुरु, गंगानगर, अमृतसर, तिरुपती अशा लांब पल्ल्याच्या गाड्यांची वर्दळ असते. मात्र या धावणाऱ्या गाड्यातून विनातिकीट प्रवाश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. एवढेच नाही तर या विभागात जवळपास ३४० तिकीट तपासणीक आहे. यांची नजर चुकवून हे फुकटे प्रवाशी प्रत्येक गाडीतून प्रवास करतात. त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाची करडी नजर असून ते वेळोवेळी रेल्वेतून, खासगी वाहनातून, एसटी बसमधून अचानक रेल्वेतील फुकट्या प्रवाशांची तपासणी करण्यात येते. सात महिण्यात फुकट्या प्रवाशांकडून साडेचार कोटी रुपयाचा महसुल जमा केला आहे. 

कठोर पावले उचलण्यात यावी- प्रवाशांची मागणी 

यासाठी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिवाकर बाबु, सहाय्यक अखील खान, जॉन बेनहर हे आपल्या पथकासंह नेहमीच सतर्कता बाळगत या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करतात. मात्र या फुकट्या प्रवाशांचा त्रास तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडून यावर कठोर पावले उचलण्यात यावी अशी अपेक्षा प्रवाशांतून व्यक्त केल्या जात आहे. 

फुकट्या प्रवाशांचा नाहक त्रास

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून मोठ्या संख्येने रेल्वे गाड्या धावतात. या गाड्यांमधून अनेक प्रवाशी विनातिकीट प्रवास करतात. या फुकट्या प्रवाशांचा नाहक त्रास नियमानुसार तिकीट काढून करणाऱ्या प्रवाशाना होतो. तसेच फुकटे प्रवाशी हे प्रवाशांचा किंमती सामानाची चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनी प्रवास करतांना तिकीट काढूनच रेल्वेचा प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दमरे, नांदेड विभाग
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crore from the freight passengers on the train