Video : तीन दिवसाच्या सुट्टीनंतर बॅंकांत उसळली ग्राहकांची गर्दी 

Nanded Photo
Nanded Photo
Updated on

नांदेड : लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरीकांचे हाल होणार नाहीत म्हणून केंद्र शासनाने जनधन खात्यावर प्रत्येकी ५०० रुपये जमा केले आहेत. मात्र, खात्यावर जमा झालेले पैसे सरकार परत घेईल या भितीने तसेच सलग तीन दिवस बॅंका बंद होत्या म्हणून सोमवारी पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी होती.  

घरी बसून ‘कोरोना’च्या व्हायरसला हरविण्यासाठी २२ मार्च २०२० मध्यरात्रीपासून संपूर्ण देश २० दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. शासनामार्फत तीन महिणे पुरेल इतक्या राशन व पाण्याची व्यवस्था केली जात आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांचे मात्र हाल सुरु आहेत. जनधन खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी आलेल्या खातेधारकांची बँकामध्ये गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळली जाईल याबद्दल खबरदारीचा उपाय म्हणून बँकेच्या खाते क्रमांकानुसार दिवस ठरवून दिले आहेत.  

मात्र, अनेक कॉर्पोरेट बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची कुठलिही खबरदारी घेतली जात नसल्यामुळे बँकेत ग्राहकांची तौबा गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक बँकेच्या परीसरात आलेल्या ग्राहकांना बसण्यासाठी किंवा सावलिचे ठिकाण नसल्याने सावली दिसेल त्या ठिकाणी ग्राहक एकत्र दाटीवाटीने बसल्याचे व उभे असल्याचे दिसून येत आहेत. सध्या जनधन खात्यावर जमा झालेले पैसे पुन्हा परत जातील अशी लोकांच्या मनात भिती आहे.

परंतु त्यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे कुणीही काढुन घेणार नाही, किंवा पैसे परत जाणार नाहीत याबद्दल पुरसे मार्गदर्शन केले जात नाही.  त्यामुळे बँकेत खात्यावर पैसे जमा झाले की नाही. खात्यावरील पैशांची चौकशी करण्यासाठी देखील मोठी गर्दी होत आहे. परीणामी मागील वीस दिवसापासून निर्मनुष्य दिसणारे रस्त्ये लॉकडाऊन असताना देखील लोकांच्या रहदारीने गजबजु लागले आहेत.

बँक परीसरात सावली नाही, प्यायला पाणी नाही. त्यामुळे बँकेत आलेल्या सामान्य ग्राहकांचे मोठे हाल होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना इथे तिथे भटकंती करावी लागत असल्याचे सकाळने बँक व प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने सोमवारी (ता.१३ एप्रिल २०२०) पासून बहुतेक बँकेत ग्राहकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नागरीकांनी बँकेत पैसे काढणे, खात्यावरील शिल्लक जाणून घेणे किंवा अन्य सुविधांसाठी बँकेत येण्याऐवजी डीजिटल व्यवहार करण्यावर जास्त भर द्यावा. विविध बँकांचे अधिकृत अॅपचा वापर करावा, फंड ट्रान्सफरसाठी युपीआय सिस्टमचा वापर करुन गर्दी टाळावी.   
-उमेश डाखे (सहाय्यक शाखा प्रबंधक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com