esakal | निर्दयी घटना : औंढा नागनाथ येथे सख्या भावाचा केला भावाने खून 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

याप्रकरणी मृताच्या पत्नी शिवकन्या वाट यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली, की औंढा नागनाथ येथील पद्मावती शिवारात रवी वाठ (वय ४२) यांचे शेत आहे

निर्दयी घटना : औंढा नागनाथ येथे सख्या भावाचा केला भावाने खून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : येथील शेतशिवारात असलेल्या आखाड्यावर जुन्या भांडणावरून एका शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करून त्याला विहिरीमध्ये ढकलून दिल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) पहाटे उघडकीस आली. याबाबत शनिवारी (ता.२१) गुन्हा नोंद झाला. रवी वाठ (वय ४२) असे मृताचे नाव आहे. 

याप्रकरणी मृताच्या पत्नी शिवकन्या वाट यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली, की औंढा नागनाथ येथील पद्मावती शिवारात रवी वाठ (वय ४२) यांचे शेत आहे. ते गुरुवारी रात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले असता जुन्या भांडणाच्या कारणावरून राजू वाट, गणेश वाट, आदिनाथ वाट (सर्व रा. औंढा) यांनी संगनमत करून ‘सामाईक विहिरीचे बटईने केलेल्या शेतीला पाणी का देऊ देत नाही’ या कारणासह जुन्या भांडणाच्या कारणावरून रवी वाट यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी मृतदेह विहिरीत ढकलला, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले. त्या आधारे राजू वाट, गणेश वाट, आदिनाथ वाट यांच्याविरुद्ध औंढा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद झाला आहे. तपास व्ही. के. मुंढे करीत आहेत.

हेही वाचा नांदेड : अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले -

26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन

नांदेड  : महिला व बालविकास विभागाचे शासन परिपत्रक 28 जुलै 2006 नुसार हुंडाबंदी दिन 26 नोव्हेंबर 2020 रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, विभाग संस्थांनी साजरा करावा. हुंडाबंदीबाबत सर्वांनी शपथ घेऊन या दिवसापासून हुंडाबंदी सप्ताह पाळावा, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image