चाळीस दिवस नमाज पढल्याबद्दल लातूरच्या मुलांना... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

नमाज पठण हे इस्लाममध्ये अतिशय पवित्र कर्तव्य मानले गेले आहे. त्यातही पाच वेळच्या नमाजीला मानाचे स्थान आहे. या मुलांनी चाळीस दिवस पाच वेळा न चुकता नमाज पढल्यामुळे त्यांना....

लातूर : येथील बागणभाई गल्लीतील शबील शाह मशिदीत सलग चाळीस दिवस पाच वेळेसची नमाज यशस्वी केल्याबद्दल 22 मुलांना सायकलचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (ता. चार) झालेल्या कार्यक्रमात हाफिज जब्बार सहाब यांच्या हस्ते या सायकली वाटप करण्यात आल्या. 

शांतीपूर्ण जीवनासह इस्लामचे महत्त्व, मानवतेची शिकवण व बालवयात संस्कार, शिस्त यावी असा संकल्प हाजी इलियास शेख यांनी मांडला होता. त्यास ज्येष्ठ व या भागातील रहिवाशांनी सहकार्य केले. त्यात 44 मुलांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 22 मुलांनी सलग 40 दिवस पाच वेळेची नमाज यशस्वी केली.

अर्धा किलो चिकन फ्री हवे आहे का?

ही सर्व मुले सात ते पंधरा वयोगटांतील होती. त्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी हाजी अस्लम सय्यद, मोईज मौलाना, हाजी इलियास शेख, अतीक शेख, अफजल कुरेशी, अब्दुल समद शेख, मोहसीन खान, रियाज शेख, इसाक सय्यद, इलियास सय्यद उपस्थित होते.

नमाज यशस्वी केलेल्या मुलांत तौहीद अली चाऊस, उबेद मेहर अली सय्यद, मुजाहेद अकबर सय्यद, जिशान एहसान सय्यद, जिशान रफीक शेख, अयान अमीन शेख, मुस्तकीम अनवर सय्यद, रेहान अनवर सय्यद, फरमान रहेमत सय्यद, सुलतान मुबीन शेख, सुफियान मुनवर सय्यद, हरीस निसार शेख, जैद निसार शेख, फैसल अलीम पठाण, अर्शद इसाकमिया शेख, फरहान अब्दुल करीम शेख, जिशान तैमूर पठाण, वळसंगकर तोहिद पाशा, नवाज फेरोजखान पठाण, साद रफीक शेख, तांबोळी तल्हा महेबूब, सलमान लायक शेख यांचा समावेश होता.

सलमानला ठोकल्या मुंबईत बेड्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycle Gifted To Children For Namaj In Latur