Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी दहिफळच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे. नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही.
dahifal youth end his life for maratha reservation wrote note to govt
dahifal youth end his life for maratha reservation wrote note to govt Sakal

कळंब : मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबता थांबत नसल्याचे चित्र असून तालुक्यातील दहिफळ येथील १० वी पर्यंत शिक्षण झालेल्या रोहण राजेंद्र भातलवंडे (वय-१९) वर्षाच्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे, सरकारने जागे व्हावे.

आरक्षण द्या अशी चिठ्ठी लिहून शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेवून गुरवार (ता. ४) सायंकाळी सात वाजता आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तालुक्यातील दहिफळ येथील तरुण रोहण राजेंद्र भातलवंडे हा सुशिक्षित बेकार तरुण असून १० वी पर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. त्याने कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे. नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही.

गावात दुध डेअरीचा व्यवसाय सुरू केला. दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वतः च्या तीन गायी सांभाळत होता. दुधाचे दर कमी-जास्त होत असल्याने चिंतेत होता. कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला. कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही.

जर आरक्षण असते तर कुठंतरी संधी मिळाली असती अशा सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता. दहिफळ येथे ३ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होती. आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत आहेत.

अखेरची लढाई सुरू आहे. सरकारने लवकर आरक्षण जाहीर करावे यासाठी दबाव वाढत आहे. आंदोलने होत आहेत. सकल मराठा समाज एकवटला आहे. आझाद मैदानावर २० जानेवारी रोजी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत.

त्यांच्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी गावात बैठक घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुःखद घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी मी बलीदान देत आहे.

सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे असा मजकूर लिहून रोहणने गळफास घेऊन जीवन संपविले आहे. एकीकडे आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. याबाबत येरमाळा पोलिसात दत्ता नानासाहेब भातलवंडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील दहीफळ तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून मराठा आरक्षण मागणीची चिट्टी खिश्यात पंचनामा दरम्यान पोलिसांना मिळून आली आहे.

- अतुल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक येरमाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com