वादळी वाऱ्याचा फळबागांना फटका

file photo
file photo
Updated on

परभणी : जिल्ह्यात बुधवारी (ता. १५) रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उष्णतेची लाट सुरू झाली असताना अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असताना पुन्हा वादळी वारे वाहू लागले आहेत. बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान, तुफान वादळी वारे वाहू लागले. परभणी शहरासह परिसरात याच दरम्यान, वारे वाहण्यास सुरवात झाली. सायंकाळीच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वाटू लागली होती. परभणी, पूर्णा, सेलू, पाथरी या तालुक्यांत ढगाळ वातावरण होते. रात्रीच्या सुमारास पावसाचा हलका शिडकावा झाला. परंतु, वाऱ्याचा वेग जास्त होता.


झरी परिसरात पेरूच्या बागाचे नुकसान
बुधवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झरी (ता.परभणी) परिसररात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. झरी येथील बागायतदार शेतकरी माऊली करंजकर यांच्या चार एकरावरील पेरू बागाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकताच त्यांच्या पेरू बागेत बहार सुरू झाला आहे. असे असताना बुधवारच्या वादळी वाऱ्याने बागेचे मोठे नुकसान झाले आहे. बागेतील झाडे, फळे खाली पडली आहेत. लॉकडाउनमुळे फळांची विक्री थांबली आहे. मोठे व्यापारी फळे खरेदी करण्यात तयार नसल्याने बागेत फळे सडली जात आहेत. त्यात आता वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने फळांसह झाडांचे नुकसान झाले आहे.
 
हेही वाचा व पहा - व्हिडिओ : पोलिस हवालदार विठ्ठल कटारे यांची गाण्यातून जनजागृती

हेही वाचा...
 

परभणीचे तापमान ४१ अंशावर
परभणी :
परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली असून गुरुवारी (ता.१६) तापमान ४१ अंश एवढे नोंदवले गेले आहे. आजच्या दिवशी तापमानाची दाहकता चांगलीच होती. तसेच नांदेडचे ४०, हिंगोली ३८ अंशावर तापमान होते.
यंदा सतततच्या ढगाळ वातावरणामुळे उष्णतेच्या लाट उशीरा सुरु झाली आहे. अजुन कडक उन्हाचा दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे आताच एवढी उन्हाची भयंकर उन्हाची परिस्थिती असल्याने मे महिण्यात कशी राहील याची चिंता लागली आहे. सध्या भर दुपारी अंग भाजणारा सुर्यप्रकाश पडत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे मार्च महिण्यात उष्णतेची तिव्रता जाणवली नाही. तसेच ता.१३ एप्रिलपर्यंत देखील कडाका नव्हता. मात्र ता.१४ एप्रिलपासून उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचा तडाखा सुरु होत आहे. गुरुवारी पारा चांगलाच तडकला होता. ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com