esakal | हिंगोलीत महिला व विद्यार्थीनीच्या सुरक्षेसाठी मार्शलसह दामीनी पथक सक्रिय
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याकरीता हिंगोली शहरात तीन मोटारसायकल वरील पोलिसांचे बीटमार्शल चोवीस तास अनेक ठिकाणी कार्यरत राहणार आहेत .

हिंगोलीत महिला व विद्यार्थीनीच्या सुरक्षेसाठी मार्शलसह दामीनी पथक सक्रिय

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : दिवाळीचा सण जवळ आला आहे आहे .त्यामुळे रोडरोमिओंसह टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उपसण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी महिलांच्या दामिनी पथकाला सक्रिय केले आहे. तसेच गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याकरीता हिंगोली शहरात तीन दुचाकीवरील पोलिसांचे बीटमार्शल चोवीस तास अनेक ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.

सध्या कोरोनाचे संकट कायम असले तरी बाजारपेठसह इतर सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी बीट मार्शलसह दामिनीनी चंग बांधला आहे. यासोबतच बाजार पेठसह इतर ठिकाणी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिला व युवती येत असताना त्यांच्या छेडछाडीचे प्रकार घडू नये. या दृष्टीकोणातून पुन्हा एकदा महिला पोलिस अधिकारी व कर्मचायांच्या दामिनी पथकाला सक्रिय करण्यात आले.

हेही वाचाहिंगोली : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंदूबाई करतात कोरोना वॉर्डात सेवा

वाहनातून अनेक ठिकाणी हे पथक जाऊन टवाळखोरासह रोडरोमिओंवर गर्दीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करणार आहे. यासाठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक धुळे यांच्यासह अन्य चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच हिंगोली  शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेकरीता जिल्हा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण यांनी करण्याकरीता तीन दुचाकीवर सहा पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हे पथक चोवीस तास हिंगोली शहरातील विविध ठिकाणी जाणार आहे. 

जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी महिलांच्या दामिनी पथकाला सक्रिय करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरीता सहा पोलिसांचे तीन वाहनावरील बीट मार्शल पथक सुरू केले. याचा शुभारंभ नुकताच  करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिष देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस कृष्णदेव पाटील, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे आदींची उपस्थिती होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे