esakal | धरणाचा सांडवा अज्ञात व्यक्तीने फोडला
sakal

बोलून बातमी शोधा

केळगाव (ता. सिल्लोड) ः मुर्डेश्वर मंदिर परिसरामधील गट क्रमांक 17 मधील धरणाचा सांडवा अज्ञात व्यक्तीने फोडल्यामुळे धरणातील तीस टक्के पाणी वाहून गेले आहे.

केळगाव (ता. सिल्लोड) येथील मुर्डेश्वर संस्थान परिसरातील धरणाचा सांडवा फोडण्यात आला आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. सांडवा फोडल्यानंतर तातडीने पाटबंधारे विभागाने पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, विभागाने त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

धरणाचा सांडवा अज्ञात व्यक्तीने फोडला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आमठाणा, ता. 25 (जि.औरंगाबाद) ः केळगाव (ता. सिल्लोड) येथील मुर्डेश्वर संस्थान परिसरातील धरणाचा सांडवा फोडण्यात आला आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. सांडवा फोडल्यानंतर तातडीने पाटबंधारे विभागाने पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, विभागाने त्याकडे दुर्लक्ष होत आहे.


सदरील धरण मुर्डेश्‍वर संस्थान मंदिराच्या वरच्या बाजूस आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील विहिरांना चांगल्या प्रकारे बाराही महिने पाणी असते. आतापर्यंत परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात चांगल्या प्रकारे पाणी साठा झाला आहे. शासन एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून "पाणी आडवा पाणी जिरवा' हा उपक्रम करते, तर दुसरीकडे सांडवे फोडले जात आहेत. या सांडव्याला मोठी भगदाडे पाडली आहेत. याकडे कोणाचे लक्ष नसल्याने हे सांडवे फोडले जात आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

पाटबंधारे विभाग तथा लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा तालुका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पण, अज्ञात व्यक्तीने या धरणाचा सांडवा फोडल्यामुळे त्यातील जवळपास 30 टक्के पाणी वाहून गेले आहे. या धरण परिसरामधील संपूर्ण जमीन ही खडकाळ आहे. त्यामुळे या धरणामध्ये चांगल्या प्रकारे पाणीसाठा शिल्लक राहत असतो. या गावाला जवळपास पाच धरणे असून या धरणांकडे पाटबंधारे विभागाचे जास्त प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे. त्यामुळे यावर कोणाचाही वचक राहिला नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. केळगाव येथील सरपंच सोमनाथ कोल्हे यांनी सांगितले, की दोन दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धरणाचा सांडवा फोडला व आम्ही सकाळी पाहणी केली. रात्री परत तो कोणीतरी बुजून टाकला. सदरील व्यक्तीचा तपास करून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा जेणेकरुन दुसऱ्यांदा कोणीही असे कृत्य करणार नाही.
 

loading image
go to top