आडुळ - घरात कोणी नसल्याची संधी साधुन अज्ञात दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले दिड लाख नगद, दहा तोळे सोने व चांदी असा अंदाजे दहा लाख रुपये किंमती भरदिवसा धाडसी चोरी करून पोबारा केल्याची घटना बुधवारी (ता. १८ ) रोजी दुपारी १:४५ ते दोन वाजेच्या दरम्यान आडुळ (ता. पैठण ) येथील मोमीनपुरा भागात घडल्याने गावात घबराटीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.