esakal | कोरोना इफेक्ट - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ग्रामदेवता व कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या योगेश्वरी देवीचे प्रत्यक्ष दर्शनही सोमवार (ता.16) सकाळपासून बंद करण्यात आले आहे.

कोरोना इफेक्ट - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि. बीड) - अंबाजोगाई येथील ग्रामदेवता व कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या योगेश्वरी देवीचे प्रत्यक्ष दर्शनही सोमवार (ता.16) सकाळपासून बंद करण्यात आले आहे. बाहेरील सभामंडपातून मात्र हे दर्शन सुरू ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर समितीने हा निर्णय घेतल्याचे समितीचे संचालक श्रीराम देशपांडे यांनी सांगितले. 

अंबाजोगाईची योगेश्वरी हे राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. राज्यातून हजारो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. सध्या जगासह देशात सर्वत्र कोरोना विषाणूंच्या आजाराचे थैमान सुरू असल्याने, याचा फैलाव रोखण्याची काळजी घेण्यासाठी येथील मंदिर समितीने योगेश्वरी देवीचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गाभाऱ्यातले दर्शन बंद केले असले तरी, बाहेरील होमकुंडापासून देवीचे मुख दर्शन मात्र सुरू ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून योगेश्वरी देवीचे प्रत्यक्ष दर्शन बंद ठेवण्यात आले असून, बाहेरून मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असा, सूचना फलकही बाहेर भिंतीवर लावण्यात आला आहे. देवीचा प्रसाद देण्यासाठी पुजारीही बाहेरच्या दरवाज्यातच बसले होते. फक्त पुजेसाठी पुजाऱ्यांना आत प्रवेश दिला जाणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत हे प्रत्यक्ष दर्शन बंद राहणार असल्याचे सूचना फलकात म्हटले आहे. 

loading image
go to top