प्रतीक्षा ही सासू सविता सोबत जालन्यात राहते होती. आज (ता. २) पहाटे सासू सविता हिचा भीतीवर डोके आपटून सून प्रतीक्षा हिने खून केला. त्यानंतर मयत सविताचा मृतदेह गोणीत भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
जालना : शहरामधील भोकरदन नाका (Bhokardan Naka) परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सुनेने सासूची हत्या करून मृतदेह गोणीत भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. दोन) उघडकीस आला. सासूची हत्या करून संशयित सून पहाटे फरार झाली आहे.