

Woman Robbed in Broad Daylight in Davervadi
Sakal
पाचोड : शेतात कापूस वेचणीसाठी जाणाऱ्या महिलेस एकटी असल्याचे पाहून अज्ञात दोन चोरट्यांनी तिला रस्त्यात गाठून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून नेल्याची घटना दावरवाडी (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.१०) भर दुपारी घडली असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. यासंबंधी अधिक माहिती अशी, दावरवाडी येथील शारदाबाई भरत मोरे (वय ३५) या महिलेने आपल्या गावाचा आठवडे बाजार असल्याने दूपारपर्यंत बाजारहट उरकून 'त्या' कापूस वेचणीसाठी दावरवाडी - सोनवाडी रस्त्याने आपल्या शेताकडे निघाल्या.