प्रेमाचा दिवस येतोय जवळ,  बाजारपेठ झाली गुलाबी !

file photo
file photo

परभणी : जीवनाच्या बागेत अलगद उमललेले फूल म्हणजे ‘प्रेम’ असे प्रेम अभिव्यक्त करायला शब्द सुचत नाहीत. मग देहबोलीतूनच ‘ती’ किंवा ‘तो’ मनात फुलणारे प्रेम व्यक्त करतात असेच अनेकांना आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी संधी असणारा ‘व्हॅलेंटाईन-डे’ येत्या शुक्रवारी  (ता.१४) साजरा होत आहे. चार दिवसांवर आलेल्या प्रेमाच्या उत्सवासाठी परभणीची बाजारपेठ गुलाबी रंगात न्हाऊन गेली आहे. येथील व्हॅलेंटाईनला खास पुण्याच्या गुलाबाची साथ मिळाली आहे. सोशल मिडीयाच्या युगातही ग्रिटींगची क्रेझ कायम आहे.


ता.सात फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. या आठवड्यात प्रियकर, प्रियसी एकमेकांना भेटवस्तू देत आपले प्रेम व्यक्त करतात. त्याची सुरुवात ता. सात फेब्रुवारीला ‘रोज डे’ने झाली आहे. प्रेम म्हणजे भावनांची गुंफण, नात्यांना ओवणारी एक सुरेल माळ, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ असं कितीही म्हटलं तरी मनातलं ‘गुपित’ ओठावर आणण्याची किंवा ते व्यक्त करण्‍याची प्रत्येकाची विशिष्ट प्रकारची शैली असते. कोणी ‘प्रेम’ शब्दात व्यक्त करतं. तर कोणी नजरेचे तीर पाठवतं. ‘प्रेम’ व्यक्त करायला कधी कधी शब्द अपुरे पडतात आणि मनात पिंगा घालणारे प्रेम ‘तिच्या’ किंवा ‘त्याच्या’ देहबोलीतून प्रकट होते. संबंधित संदेशाचे तो किंवा ती  अर्थ लावते. यासाठी प्रेमाच्या गावाला जाण्यापूर्वी त्या प्रांतातल्या भाषेची जाण आवश्यक असते. प्रेम कुणीही कुणावरही करू शकते, प्रेम व्यक्त करण्यासाठी गेल्या दशकभरात प्रेम पत्रांनी आपले स्थान टिकवून ठेवले होते. मात्र, आता हायटेक युगात सोशल मिडीयाचा  वापर होत आहे. सोशल मिडीयावरून प्रेम व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाइनने मस्त डिझाइन केलेल्या संदेशातून प्रेमाचा धागा दृढ केला जात आहे.

हेही  वाचा व पहा - Video- आता सायकलवरही धुता येणार कपडे

ग्रिटींग, भेटवस्तुची क्रेझ कायम
 रंगबेरंगी फुलं, चॉकलेट, आकर्षक भेटवस्तू या तरुणाईला  भावतात. पिवळ्या रंगाचे फूल म्हणजे मैत्री, पांढरे म्हणजे फक्त ओळख तर लाल म्हणजे प्रेम असे संकेतही त्यातून निर्माण झाले. त्यानंतर कुछ मिठा हो जाएचा जमाना आला. आणि प्रेम व्यक्त करताना चॉकलेट देणेदेखील प्रथाच झाली.जोडपे आणि युवा व्हॅलेंटाइन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरा करतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना सुंदर टेडी गिफ्ट करून आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. सध्या परभणीच्या बाजारापेठेत विविध प्रकारचे टेडी उपलब्ध झाले आहेत. त्यातही पिलो टेडीला मागणी आहे. पिलोमध्ये त्या दोघांचे फोटो लावण्याची सोय आहे. त्यामुळे सध्या पिलोला मागणी आहे. नवीन मॅझीक मिरची भुरळ प्रेमविरांना पडत आहे.१५० रुपयापासून ते २ हजार ५०० रुपया पर्यंतचे टेडी विक्रीस आले आहेत.तर ५० रुपयापासून ते १२०० रुपयापर्यंतचे ग्रिंटीगही दाखल झाले आहेत. अशी माहीती शहरातील गांधी पार्क येथील प्रिया ग्रिटींग हाऊसचे सुनील भोकरे यांनी सांगीतले. यंदाच्या व्हॅलेटाईनसाठी मनाला भावणारे विविध आकाराचे चॉकलेटस आकर्षक पॅकमध्ये आल्याने तरुणाईंच्या पसंतीला उतरले आहे. वेगवेगळ्या इमोजी  आणि हार्ट आकारातल्या चॉकलेटसला पसंती मिळत आहे. किचन, लव्हस्टोरी बुक यांनाही मागणी आहे.
 

‘डच’ गुलाब दाखल
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या सप्ताहात गुलाबाला मोठी मागणी असते. खास ‘रोझ डे’ आणि शेवटचा ‘व्हॅलेंटाईन’ या दिवशीची वाढती मागणी लक्षात घेऊन जास्तीचे गुलाब पुण्याहून मागविले आहेत. यंदाही डच या प्रकारातील गुलाब बाजारात दाखल झाले आहेत. ३० रुपये नग या प्रमाणे गुलाब मिळत आहेत.
नागेश फुलारी, फुल विक्रेता, परभणी


ग्रिटींग देण्याची क्रेझ कायम
सध्या सोशल मिडीयामुळे प्रेम व्यक्त सोपे झाले आहे. तरीही ‘व्हॅलेटाईन डे’ साठी ग्रिटींग देण्याची क्रेझ कायम आहे. शब्दरुपी ग्रिटींग आणि सोबत चॉकलेट अथवा टेडी भेट देण्याची पंरपरा आजही प्रियकर, प्रियसी जपतात.
सुनील भोकरे, ग्रिंटीग विक्रेते, परभणी

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com