Video- आता सायकलवरही धुता येणार कपडे   

photo
photo

सेनगाव (जि. हिंगोली) ः वडिलांचा इलेक्ट्रिक रीपेरिंगचा व्यवसाय. शाळेनंतर इतरत्र वेळ घालविण्यापेक्षा दुकानात रमत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अमर पेनूरकर विद्यार्थ्याने कपडे धुऊन वाळविण्यासह विविध कामात उपयोगी येणारी सायकल तयार केली आहे. या प्रकल्पाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. 

शहरात संजय पेनूरकर हे मागील अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक रीपेरिंगचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा अमर पेनूरकर येथील मातोश्री लक्ष्मीबाई येवले विद्यालयात सातवीत शिक्षण घेत आहे. शाळा सुटल्यानंतर इतर मुलांप्रमाणे खेळात रमण्याऐवजी तो वडिलांच्या दुकानात जास्त वेळ थांबतो. याच वेळी त्यांना बहुपयोगी सायकल बनवण्याची संकल्पना सुचली. धावपळ व स्पर्धेच्या युगात मानवी जीवन गतिमान झाले आहे. त्यामुळे दिवसभर कामाच्या चिंतेने व्यायामाकडे दुर्लक्ष होते.

सायकलला पाण्याची टाकी बसविली

परिणामी आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्‍भवत आहेत. घरातील कपडे धुऊन ते सुकविण्यासाठी बहुपयोगी सायकल बनविण्यासाठी अमरने सुरवात केली. भंगारात पडून असलेली सायकल घेतली. त्याची दोन्ही चाके काढून टाकली. २० लिटर पाण्याची टाकी कापून त्यात जाळी बसविण्यात आली. जाळीला सायकलची चैन जोडली. पायंडल फिरविताच जाळी वेगाने फिरते. त्यामध्ये कपडे टाकल्यावर ते स्वच्छ धुतल्या जातात. शिवाय कपडे सुकविलेही जातात. यासोबतच घरातील विळी, चाकू आदी साहित्याला तीक्ष्ण धार लावता येते. रई सुद्धा लावता येते. 

शारीरिक व्यायाम होतो

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्या जातात, तशा पद्धतीने सायकलचे पायडल फिरविल्यावर कपडे धुतले जातात. शिवाय  सायकलिंगमुळे शारीरिक व्यायाम होतो. घरातील विविध कामे सहज सोप्या पद्धतीने पूर्ण करता येतात. या माध्यमातून पैसा, पाणी व विजेची बचत होण्यास मोठी मदत होते. शिवाय प्रदूषणही होत नाही. विद्यार्थी अमर पेनूरकर व मार्गदर्शक शिक्षक विलास कोकाटे यांनी या वर्षीच्या नवव्या इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर केलेल्या बहुपयोगी सायकल या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. 

प्रदूषण टाळता येते

सायकलपासून व्यायम करता करता सहजपणे अनेक कामे करता येतात. बहुउपयोगी सायकलच्या माध्यमातून इंधन लागत नसल्याने प्रदूषण टाळता येते. आदी फायदे होत असल्याने ही सायकल बहुउपयोगी ठरली आहे. या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील ६२ प्रयोगांतून पाच प्रयोगांची निवड राज्यस्तरासाठी झाली आहे. त्यामध्ये येवले विद्यालयाच्या प्रयोगाचा समावेश आहे. या निवडीमुळे येवले विद्यालयाला पाचव्यांदा राज्य स्तरावर जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.

शिक्षकांचे मार्गदर्शन

अमर पेनूरकर व मार्गदर्शक विलास कोकाटे यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अर्जुनराव येवले, मुख्याध्यापक विजय येवले, एस. टी. मुटकुळे, जे. टी. गिते, आर. बी. वाघमारे, व्ही. एस. जाधव, पी. एस. शिंदे, व्ही. आर. गुगळे, जे. बी. हगवणे, आर. डी. कोकाटे, पी. एन. मुटकुळे, पी. एन. कोळपे, एल. वाय. घ्यार, बी. पी. बुळे, यू. व्ही. घुगे, के. व्ही. धवसे, एस. व्ही. येवले, ए. जे. हगवणे, एस. व्ही. चोपडे यांनी अभिनंदन केले आहे. 

वडील व शिक्षकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन


शाळेनंतर मी बहुतांश वेळ वडिलांच्या इलेक्ट्रॉनिक रीपेरिंग दुकानात राहतो. तिथे मला बहुउपयोगी सायकल तयार करण्याची संकल्पना सुचली. घरातील विविध कामांसह शारीरिक व्यायाम या माध्यमातून होतो. या प्रकल्पासाठी माझे वडील व शिक्षकांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 
-अमर पेनूरकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com