Beed Jail Attack : वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच आमच्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला, असा आरोप दोन कैद्यांनी केला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद असल्याचा दावा करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बीड : वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले व इतरांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार कैदी महादेव गित्ते व राजेश वाघमोडे यांनी केली. हा प्रकार कारागृहाच्या सीसीटीव्हीत कैद असल्याचा दावाही करण्यात आला.