esakal | जालना : शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू      
sakal

बोलून बातमी शोधा

death.jpg

भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

जालना : शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू      

sakal_logo
By
कैलास दांडगे

पारध (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आदित्य संदीप खंडाळे असे मृत मुलाचे नाव आहे. घटना सोमवारी (ता. 2) पहाटे दोन वाजता उघडकीस आली आहे.

भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे आपल्या आजोबांकडे शिक्षण घेत असलेला आदित्य संदीप खंडाळे (वय 10 रा. जांब, जि. बुलढाणा) हा रविवारी (ता. 1) पाचच्या सुमारास  मोहळाई येथील भागवत पांडुरंग पालकर यांच्या गट न.14 मधील शेततळ्यात पोहण्यासाठी गेला असता, यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. 2) पहाटे उघडकीस आली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होते.

loading image
go to top