Breaking News - बीड जिल्ह्याला अजून एक धक्का, स्वॅब घेतलेल्या एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६ कोरोनाग्रस्त आढळले असून एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर सहा जण उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. २९ कोरोनाग्रस्तांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड : जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून स्वॅब घेतलेल्या एकाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील एका वृद्धाच्या स्वॅब अहवालाकडे लक्ष आहे. रात्री कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर तासाभरात त्याचा मृत्यू झाला. आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६ कोरोनाग्रस्त आढळले असून एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर सहा जण उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. २९ कोरोनाग्रस्तांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील रुग्ण हा मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. यापुर्वी त्याने विविध ठिकाणी उपचार घेतले. मात्र, श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यास बीड येथे आणण्यात आले. त्याला येथे विलगिकरन कक्षात  दाखल करुन घेण्यात आले. रात्री त्याचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतला.  यानंतर तासाभराने सदरील रुग्णाचा मृत्यू झाला. आता  अहवालाकडे लक्ष लागले असून त्यानंतर खरे कारण समजू शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a corona positive patient in Beed district

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: