तिसरी मुलगीच झाल्‍याच्या दडपणाने विवाहितेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

तिसरी मुलगीच झाल्याचे दडपण घेऊन रक्तदाब एकदम कमी झाल्यामुळे सेलू येथील  बाळंत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बीड येथील जिल्हा रुग्णालयात घडली. 

जातेगाव (जि. बीड) -  तिसरी मुलगीच झाल्याचे दडपण घेऊन रक्तदाब एकदम कमी झाल्यामुळे सेलू येथील सत्तावीसवर्षीय बाळंत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. २७) घडली.

सेलू (ता. गेवराई) ज्योती ज्ञानेश्वर जगताप (वय २७) या महिलेस बुधवारी बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे ज्योतीवर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. तिने मुलीला जन्म दिला. दरम्यान, पहिल्या दोन मुली अन् तिसरीही मुलगीच झाली. याचा ज्योतीने ताण घेतला.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

रक्तदाब एकदम कमी झाला. यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. तिच्यावर दुपारी सेलू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्योती आबासाहेब जगताप यांची सून तर उपसरपंच परमेश्वर जगताप यांच्या मोठ्या भावजय होत. जन्मलेले बाळ सुखरूप असून आईच्या मृत्यूमुळे सेलू येथे हळहळ व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a married woman due to the birth of a third daughter

Tags
टॉपिकस
Topic Tags: