जालन्यात कोरोनाचे सात बळी 

उमेश वाघमारे 
Monday, 10 August 2020

जालना -  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोविडमुळे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. त्यात रविवारी (ता. नऊ) सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत ९६ जणांचा कोरोनामुळे बळी गेली आहे.

जालना -  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोविडमुळे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. त्यात रविवारी (ता. नऊ) सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत ९६ जणांचा कोरोनामुळे बळी गेली आहे. तर ९३ कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण दोन हजार ८७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत; तसेच रविवारी १० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एक हजार ७४६ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या एक हजार ३० जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत तब्बल ९६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामध्ये रविवारी (ता.नऊ) सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये पुणे येथील कात्रज, भारती विद्यापीठ येथील एक ७० वर्षीय पुरुष, जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील ७६ वर्षीय पुरुष, जालना शहरातील बालाजीनगर येथील ६० वर्षीय महिला, कांचननगर येथील ७६ वर्षीय पुरुष, आनंदवाडी येथील ६५ वर्षीय महिला, देऊळगावराजा येथील ७७ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील भक्तीनगर येथील ८० वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ कायम सुरू असून रविवारी ९३ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही दोन हजार ८७२ झाली आहे.  

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, रविवारी दहा जणांना कोरोनावर मात केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. यात शहरातील शंकरनगर येथील दोन, साई गार्डन, रेवणगाव, समर्थनगर, सुखशांतीनगर, सिरसाळा सावंगी, आयटीआय परिसर, राणानगर व राज्य राखील पोलिस बल क्रमांक तीन येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ४६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात ५५९  जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यात ५५९ जणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील  बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ४७, शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह येथील १५, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ११, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे २०, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ८१, पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ४४, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे १७, केजीबीव्ही येथे १२, मंठा येथील केजीबीव्ही येथे नऊ, मॉडेल स्कूल येथे दहा, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल येथे ४२, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४१, अंकुशनगर साखर कारखाना येथे  ६३, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १३, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १३, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ४६, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे ४२, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे चार जणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात  ठेवण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of seven corona patients in Jalna