भाजपा तालुकाध्यक्षांसह साथीदारांकडून जीवे मारण्याची धमकी; परस्पराविरोधात पोलीसात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व त्यांच्या दोन साथीदारांनी एकास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मंगळवार (ता.१९) रोजी परस्परा विरोधात अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज - भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व त्यांच्या दोन साथीदारांनी एकास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मंगळवार (ता.१९) रोजी परस्परा विरोधात अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालुक्यातील पिसेगाव येथील नवनाथ सुधाकर नेहरकर (वय-२८) हा सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या वडीलांचे फिटनेस प्रमाणपत्र काढण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेला होता. यावेळी त्याठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्यासोबत अविनाश रामभाऊ नेहरकर व पिंग्या नेहरकर हे तिघे आले. तेव्हा भगवान केदार हे नवनाथ नेहरकर यांना म्हणाले, तू माझ्या विरूध्द कुठेही काय म्हणून बोलतोस, तू जास्तच माजलास! तेव्हा त्याच्या सोबत असणारे अविनाश नेहरकर, पिंग्या नेहरकर हे दारु प्यालेले होते. त्यामुळे त्यांनी भगवान केदार यांची बाजू घेवून मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माझ्या जीवितास धोका असल्याचे नवनाथ नेहरकर याने पोलीस दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी तिघा जणाविरोधात केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर पुढील तपास करीत आहेत. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष यांनी मंगळवारी नवनाथ नेहरकर यांच्या विरोधात पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, नवनाथ नेहरकर याने माझी बदनामी करणारे मॅसेज फेसबुक सारख्या सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

तसेच मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  या भगवान केदार यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून नवनाथ नेहरकर यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death threats from BJP taluka president and his associates crime