चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन तरुणाचा मृत्यू

सोमनाथ पवार
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

जेहूर : मोबाईल चार्जिंगला लावत असताना अतिरिक्त विजेचा पुरवठा सुरु झाला. या विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना जेहूर (ता.कन्नड, जि. औरंगाबाद) येथे गुरुवारी (ता.२७) उघडकीस आली.

संजय तातेराव पवार (वय-34) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (ता.२६) संजय हे रात्री जेवण करून मोबाईल चार्जिंगला लावत असताना जास्तीचा वीज पुरवठ्याने चार्जिंगचा स्फोट झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ-भावजई असा परिवार आहे.

या घटनेची माहिती देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात कळविण्यात आली आहे.  घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कन्नड येथील प्राथमिक आरोग्य केद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: Death of the youth in Jihur by electric shock