विष्णुपूरी प्रकल्पासाठी महावितरणचा ‘हा’ निर्णय 

file photo
file photo

नांदेड : माहे एप्रिल व मे महिन्यामध्ये नांदेड शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून विष्णुपूरी जलाशयातील पाणी साठ्याचा अनियंत्रीत उपसा होवू नये यासाठी विष्णुपूरी प्रकल्पाच्या दोन्ही तिरावरील एक्सप्रेस फीडरचा वीजपुरवठा बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.

नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकासाठी विष्णुपूरी जलाशयातील ३६.५० दलघमी पिण्याचे पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. विष्णुपूरी जलाशयावरील दोन्ही तिरावरील शेतकऱ्यानी बसविलेल्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केला तरच अनधिकृत उपशावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. 

सध्या २८.६७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध

विष्णुपूरी जलाशयात आज रोजी २८.६७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे माहे एप्रिल व मे महिन्यात तसेच पुढील काळात पाणीसाठा उपलब्ध असणे आवश्यक असल्याने जिल्हाधीकारी डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीपासून पंधरा दिवसांकरिता, म्हणजेच ता. १६ एप्रिल ते ता. ३० एप्रिलपर्यंत विष्णुपूरी जलाशयाच्या दोन्ही तिरावरील एक्सप्रेस फीडरचा वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

एक्सप्रेस फीडरचा वीजपुरवठा ता.३० एप्रिलपर्यंत बंद

ता. दोन एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामीण व नागरी भागासाठी पाणी टंचाईच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंबंधीच्या बैठकीमध्ये विष्णुपूरी जलाशयाच्या एक्सप्रेस फीडरचा वीजपुरवठा ता.३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने महावितरणने निर्णय घेतला आहे.

साहेब, गोळ्या- औषधी संपली
निराधाराचे पैसे आलेत का?

नांदेड : लॉकडाऊनमध्ये आणि कोरोनाच्या महामारीत बँकेला जाता येत नाही. बँकेला सतत सुट्या आल्याने अनेक वृद्धांना उच्चदाब, शुगर अशा आजाराला दररोज वेळेवर गोळ्या औषधी, जेवण असने आवश्यक आहे. याचं अवस्थेत रातोळी (ता. मुखेड) येथील मारोती दुलाजी वरवटे हा वृद्ध निराधार दिव्यांग लाभार्थी व त्यांची पत्नी पण दिव्यांग आहे. 

हे दाम्पत्य कुडाच्या झोपडीत राहते. नांदेड डाक टीमचे कर्मचारी रामप्रसाद नागठाने, ग्रामीण डाक सेवक रातोळी येथे लॉकडाऊनमध्ये घरो- घरी जाऊन AEPS व निराधारचे पैसे वाटप करीत आहेत. रामप्रसाद यांनी दिव्यांग मारोती वरवटे यांना निराधाराचे पैसे देण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा मारोती वरवटे यांना त्यांचा एक पाय मोडल्याचे दिसले. 

त्यांच्या नावे जमा झालेले रुपये तीन हजार

पोस्टमन दिसताच वरवटे यांनी बापू माझ्या गोळ्या -औषधी संपली, माझे पैसे आलेत का? पोस्टमन म्हणाला काका बघतो पोस्टमननी मारोतीचे आधार कार्ड घेतले व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला जोडलं आणि बायोमेट्रिकवर अंगठा घेतला त्यांच्या नावे जमा झालेले रुपये तीन हजार रोख रक्कम पोस्टमन यांनी मारोती यांना दिले. मारोती वरवटे म्हणाले सरकारचे व पोस्ट खात्याचे लयी उपकार बघ. डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी नांदेड डाक टीमचे ग्रामीण डाक सेवक रामप्रसाद यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com