esakal | परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कारभाऱ्यांचा आज फैसला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

21 पैकी सात संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 14 संचालकपदासाठी झालेल्या मतदानात कोणाचा विजय होतो हे आता जाहिर होणार आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कारभाऱ्यांचा आज फैसला

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या 21 संचालकपदासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाचा फैसला आज मंगळवारी, ता. 23 मार्च रोजी जाहिर होणार आहे. या निवडणुकीत आमदार सुरेश वरपुडकरविरुध्द माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. 21 पैकी सात संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 14 संचालकपदासाठी झालेल्या मतदानात कोणाचा विजय होतो हे आता जाहिर होणार आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचा भाग असते. दर पाच वर्षांनी या निवडणुकीत 
जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघते. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील प्रतिष्ठीत राजकारण्यानी उडी घेतलेली आहे. बॅंकेच्या 21
संचालक पदासाठी ही निवडणुक होत आहे. त्यापैकी यापू्र्वी बिनविरोध निवड झालेल्या सात संचालकामध्ये पाच बोर्डीकर गटाचे तर दोन वरपुडकर
गटाचे आहेत. परंतू वरपुडकर गटाकडून निवडणुकीत उतरुन बिनविरोध निवड झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी निवडणुकी दरम्यान भाजप नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटात उडी घेवून जिल्हा बॅंकेच्या राजकारणात नवा पायंडा पाडून दिला.
आमदार श्री दुर्राणी यांची ही भूमिका सर्वांनाच चक्रावून टाकणारी असली तरी स्वता त्यांनीच आपण खऱ्या उमेदवारांना डावल्यामुळे वरपुडकरांचा गट सोडला असल्याचे जाहिर केले. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या आगमनामुळे बोर्डीकर गटाचे वर्चस्व वाढले असल्याचे चर्चा होत होत्या.

हेही वाचाअर्धापूर सोसायटी मतदार संघातून काॅग्रेसचे बाबुराव कोंढेकर यांना उमेदवारीसाठी ग्रिन सिग्नल

विद्यमान लोकप्रतिनिधीचा ही आज फैसला
जिल्हा बॅकेच्या संचालकपद मिळविण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील चार विद्यमान आमदार ज्यात भाजपच्या आमदार मेघना
बोर्डीकर (जिंतूर), कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर (पाथरी), राष्ट्वादी कॉग्रेसचे आमदार राजू नवघरे (वसमत) व भाजपचे आमदार तानाजी
मुटकुळे (हिंगोली) यांचा समावेश आहे. तर माजी आमदार सुरेश देशमुख (कॉंग्रेस), हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांचाही आज फैसला
जाहिर होणार आहे.

कल्याण मंडपम येथे मतमोजणी
परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता.23) सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. दुपारी 12
वाजेपर्यंत मतमोजणीचे निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मतमोजणी आज मंगळवारी, ता. 23 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून जायकवाडी परिसरातील महापालिकेच्या कल्याणमंडपम येथे होणार आहे. त्यासाठी 8 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदार संघाची तालुका निहाय मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीची प्रथम सुरवात ही प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदार संघापासून तालुकानिहाय सुरु करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीत कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदार संघ या प्रमाणे पुढील मतदार संघाची मतमोजणी करण्यात येईल. मतमोजणीसाठी 54 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image