Sugandha Wanghede
sakal
लोहा - मनात जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट तडीला नेता येते. असाच एक अनुभव शेतकऱ्याच्या मुलीशी आला. संसाराचा गाडा हाकत तिने एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी पूर्ण केली. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असे म्हणतात. ही उक्ती सार्थ ठरणारी सत्यकथा लोहा तालुक्यातील बेटसावंगी येथील शेतकऱ्याची कन्या सुगंधा सुरेखा संजय वानखेडे हिने खरी करून दाखवली.