

Deglur Hospital Embezzlement Case
sakal
देगलूर : देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन (एरिअर्स) वितरणात सुमारे ८९ लाख ७० हजार १५० रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.