

Ashadhi Ekadashi Viththal Rakhumai Palkhi and Dindi procession held with great devotion in Deglur
Sakal
देगलूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री गजानन महाराज मंदिर व श्री दत्तात्रेय मंदिर संस्थान, बापू मार्केट (देगलूर) यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई पालखी, दिंडी आणि शोभायात्रेने रविवारी देगलूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. "जय हरी विठ्ठल... विठ्ठल...!" या अखंड नामगजराने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.