Deglur Accident
Sakal
मराठवाडा
Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली
Travels Accident : नांदेड-देगलूर मार्गावर लेंडी पुलाजवळ सोमवारी (२० ऑक्टोबर) सायंकाळी ट्रॅव्हल्स आणि मुखेड आगाराच्या बसची समोरासमोर धडक होऊन २८ प्रवासी गंभीर जखमी झाले; ८ जणांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले.
देगलूर : नांदेड वरून देगलूर कडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स वर देगलूर वरून माऊली तालुका मुखेड कडे जाणारी मुखेड आगाराची बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार ता. २० रोजी सायंकाळी ५:३० वाजता शहरा नजीकच्या लेंडी पुलांजवळ घडली यातील ८ गंभीर जखमीना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला अमावस्या सुरू झाल्यानंतर घडलेल्या या घटनेने ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.

