
भाजप नेते रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गायके यांनी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्याकडे स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून केली आहे.
विधासनभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहूत मिळाले आहे. यामध्ये भाजपला राज्यात १३२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा व्हावा, अशी मागणी भाजप कर्यकर्ते करत आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे की शिवसेनेकडे द्याचे यावर दिल्लीत खलबतं सुरू आहे.