esakal | वैजापुरातील तरुणाचा डेंगीने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

अजय सतीशसिंग राजपूत

येथील अजय सतीशसिंग राजपूत (वय 20) याचे सोमवारी (ता. दोन) दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात डेंगीच्या आजाराने मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून त्याला सारखा ताप येत असल्याने लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता त्याला डेंगी असल्याचे निदान झाले. त्याने वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

वैजापुरातील तरुणाचा डेंगीने मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैजापूर, ता. 2 (जि.औरंगाबाद) ः येथील अजय सतीशसिंग राजपूत (वय 20) याचे सोमवारी (ता. दोन) दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात डेंगीच्या आजाराने मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून त्याला सारखा ताप येत असल्याने लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता त्याला डेंगी असल्याचे निदान झाले. त्याने वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

त्यानंतर अजयला तत्काळ औरंगाबाद येथील रुग्णालयात रविवारी (ता. एक) हलविण्यात आले. मात्र, सोमवारी त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अचानक अल्पशा आजाराने मुलाचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरात डेंगीचा बळी गेल्याने घबराट पसरली आहे. सोमवारी सायंकाळी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या मित्रांना दुःख अनावर झाले होते.

loading image
go to top