गेवराई - एका शेतक-याचे बीडच्या गेवराई शहरातील छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीत लाखो रुपयाची ठेवी अडकल्याने या आठवड्यात बुधवारी (ता. १८) गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन संतोष भंडारी याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांची दोन पथके फरारी चेअरमन भंडारीच्या शोधात रवाना केली असल्याची माहीती पीआय प्रविणकुमार बांगर यांनी दिली.