Palod News : बँकेच्या दारातच निराधारांची दिवाळी-भाऊबीज! दुपारी १२ वाजले तरी पालोद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कुलूप; शेतकरी, विधवा, ज्येष्ठ आणि दिव्यांगांची तासन्‌तास प्रतीक्षा

दिवाळीचा सण, भाऊबीजेचा आनंद आणि दुसरीकडे हातात पैसा नसल्याने सण साजरा करण्याची चिंता... शासनाकडून मिळणारे अनुदान व मानधन काढण्यासाठी आलेल्या निराधारांना मात्र बँकेच्या दारातच ताटकळत बसण्याची आली वेळ.
Palod District Central Cooperative Bank

Palod District Central Cooperative Bank

sakal

Updated on: 

- राहुल पारवे

पालोद - दिवाळीचा सण, भाऊबीजेचा आनंद आणि दुसरीकडे हातात पैसा नसल्याने सण साजरा करण्याची चिंता... शासनाकडून मिळणारे अनुदान व मानधन काढण्यासाठी आलेल्या निराधारांना मात्र बँकेच्या दारातच ताटकळत बसण्याची वेळ आली. पालोद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी (ता. ११) दुपारी १२ वाजेपर्यंत बंद असल्याने शेतकरी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Loading content, please wait...