लॉकडाउन काळात हातभट्ट्यांना आला ऊत

सद्दाम दावणगीरकर
Monday, 27 April 2020

 तालुक्यातील सीमावर्ती भागातील वाडी- तांड्यांवर लॉकडाउन काळात सध्या अवैध गावठी दारूचे गाळप करून विक्री करणाऱ्यांवर मरखेल पोलिसांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत सुमारे २५ हजार रुपयांची गावठी दारू, रसायन नष्ट केले. ही कार्यवाही सोमवारी (ता. २७) रोजी सकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
 

मरखेल, (ता. देगलूर, जि. नांदेड) ः तालुक्यातील सीमावर्ती भागातील वाडी- तांड्यांवर लॉकडाउन काळात सध्या अवैध गावठी दारूचे गाळप करून विक्री करणाऱ्यांवर मरखेल पोलिसांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत सुमारे २५ हजार रुपयांची गावठी दारू, रसायन नष्ट केले. ही कार्यवाही सोमवारी (ता. २७) रोजी सकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, मरखेल पोलिसांना मिळालेल्या खबरीनुसार लोणीतांडा येथे गावठी दारूचे अड्डे चालू असल्याच्या संशयावरून सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्यासह उपनिरीक्षक अजित बिरादार, सहायक फौजदार प्रकाश कुंभारे, पोलिस कर्मचारी बालाजी चिटलवाड, मोहन कनकवळे, राजेंद्र वाघमारे, संजय बरबडेकर, रवींद्र भुले, गजानन जोगपेठे, माजिद पठाण, राजीव लोखंडे, कोल्हे यांच्या पथकाने उपरोक्त ठिकाणी छापा टाकला.

हेही वाचा -  ब्रेंकिंग ः हिंगोलीत पुन्हा चार एसआरपीएफचे जवान पॉझीटीव्ह   

सदरच्या कार्यवाहीत लोणीतांडा येथील शांताबाई हरी राठोड, जेमला लच्छीराम राठोड, मुक्ताबाई रघुनाथ जाधव यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी दारूची निर्मिती करण्यासाठी ठेवलेले रसायन, गावठी दारू असा पंचवीस हजारांचा ऐवज नष्ट करण्यात आला. याशिवाय याच पथकाने हणेगाव येथेही दारू विक्रीवर छापा टाकून प्रकाश शंकेवाड याच्याजवळून तीन हजार सातशे रुपयांची दारू जप्त केली. तसेच संचारबंदी नियमांचे उल्लंघन केरणाऱ्या चौघांविरुद्ध मरखेल पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

किनवटला अवैध सागवान जप्त
वनपरिक्षेत्र नियतक्षेत्र दिगडी (मंगाबोडी) मधील बेंदीतांडा (ता. किनवट) येथे विनानंबरचा काळ्यापिवळ्या रंगाचा एक आॅटो सागवान तयार फर्निचर सोफा व पलंगाची अवैध वाहतूक करीत असताना वन विभागाच्या पथकाने पकडला. ही घटना रविवारी (ता. २६) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. दरम्यान, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. तर शनिवारी (ता.२५) रात्री साडेअकराच्या सुमारास वनपरिक्षेत्र किनवट अंतर्गत नियतक्षेत्र चिखली (ता. किनवट) मधील आरोपी शेख हसन शे.नजू यास पकडण्यात यश मिळाले, तर शेख हैदर शे. रमजान, शेख इम्रान शे. हुसेन हे फरार झाले आहेत. वरील सर्व आरोपी हे चिखली येथील रहिवासी आहेत. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी खंदारे, वनपरिमंडळ अधिकारी के. जी. गायकवाड, संतवाले, शहाजी डोईफोडे, वनरक्षक संभाजी घोरबांड, अरुण चुकलवर, साईदास पवार, रवी दांडेगावकर, अनिल फोल्ले, मुळे, कापसे, घायाळ, वाहन चालक बी. व्ही. आवळे, बी. टी. भुतनर, दांडेगावकर, वनमजूर भावसिंग जाधव यांचा सहभाग असलेल्या पथकाने पार पाडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Destroyed village alcohol, chemicals, nanded news