'मेटेंच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांकडून रसद' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मेटेंच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांकडून रसद'

मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजप सरकारने अनेक घटना दुरुस्त्या करून राज्याचे अधिकार हिरावून घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आहे, हे सांगण्याऐवजी चुकीचा अर्थ काढून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम फडणवीस करीत आहेत.

'मेटेंच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांकडून रसद'

उस्मानाबाद : ‘आरक्षणाचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडणाऱ्या खासदार संभाजीराजेंना (MP Sambhajiraje) पंतप्रधान भेट देत नाहीत. आमदार विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) कार्यक्रमाला रसद पुरविण्याचे काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadanvis) करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) न देता रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करून डोकी भडकवणे, हाच उद्योग फडणवीस करीत आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील (Sanjay Lakhe Patil) यांनी गुरुवारी (ता. तीन) येथे पत्रकार परिषदेत केला. डॉ. लाखे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजप सरकारने अनेक घटना दुरुस्त्या करून राज्याचे अधिकार हिरावून घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court Of India) निकाल काय आहे, हे सांगण्याऐवजी चुकीचा अर्थ काढून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम फडणवीस करीत आहेत. समाजमाध्यमांवर बंधने घालून एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. (Devendra Fadanvi Support Vinayak Mete)

विनायक मेटे

विनायक मेटे

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण का टिकले नाही, याचे अनेक मुद्दे आहेत. त्यामध्ये गायकवाड आयोगाचा अहवाल योग्य नव्हता तर त्यासाठी मराठा समाजाचा डेटा तयार करण्याचे काम रामभाऊ महाळगी प्रबोधिनीकडे होते. अन्य काही संस्था प्रबोधिनीला साहाय्य करीत होत्या. जोपर्यंत प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे ही संस्था होती, तोपर्यंत संस्थेचे काम योग्यप्रकारे होते. त्यांनी या संस्थेचा उपयोग एखाद्या समाजाच्या विरोधासाठी कधीच केला नाही; पण प्रबोधिनीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करीत आहेत अन् त्यांच्याच संस्थेने योग्य डेटा गोळा केला नाही, हेच कारण आरक्षण नाकारण्यात झाले आहे. आरक्षणाच्या बाबत खासदार संभाजीराजे योग्य भूमिका मांडत आहेत. पण, त्यांना पंतप्रधान वेळ देत नाहीत, हे दुर्दैवी आहे. आमदार मेटे जाणीवपूर्वक मराठा समाजाची माथी भडकवत आहेत. त्यांना रसद पुरविण्याचे काम फडणवीस करीत आहेत.’’