औशाची खडानखडा माहिती असलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत.
औसा : महायुतीला मतदारांनी 'न भूतो न भविष्यते' असे यश दिले. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली होती. ही उत्सुकता गुरुवारी झालेल्या शपथविधीने अखेर संपवली आणि मुख्यमंत्री पदावर तिसऱ्यांदा भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्णी लागली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदामुळे राज्याला एक वेगळी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.