
लातूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे जीवन संघर्षमय राहिले. ओबीसीची मोट बांधत त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठे केले. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडविली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राला अंडरवर्ल्डच्या विळख्यातून बाहेर काढले.