
Beed Railway: मागच्या ४० वर्षांपासून बीडकर ज्या प्रकल्पाची आतुरतेने वाट बघत होते, तो प्रकल्प काही अंशी पूर्ण झाला आहे. अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गापैकी अहिल्यानगर ते बीड हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
बीड शहरातील रेल्वेस्थानक परिसरामध्ये उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती. तसेच बीड जिल्ह्यातील आमदार आणि इतर लोकप्रतिनिधीदेखील यावेळी हजर होते.