सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची टीका

ई सकाळ टीम
Tuesday, 20 October 2020

या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न आहे. नियम काय आहेत त्यांना माहित आहे. ते सरकारचा बचाव करत आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

उस्मानाबाद  : या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न आहे. नियम काय आहेत त्यांना माहित आहे. ते सरकारचा बचाव करत आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.२०) बोलत आहेत. पत्रकार परिषदेतील फडणवीस बोलले

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकले सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी

पत्रकार परिषदेतील मुद्दे
- नियम काय आहेत त्यांना माहित आहे. ते सरकारचा बचाव करत आहे. मी मुख्यमंत्र्यांवर टीका करत नाही. ते बाहेर निघत नाही. केंद्र सरकार भेदभाव करत नाही. उद्धवजी बोलले तरी मदत मिळणार आहेच. त्यांनी केलेली मागणी मी त्यांना आठवण करुन दिले आहे. राज्याची पत चांगली आहे. कर्ज काढले पाहिजे.

- पवार साहेब  कधी चुकीच बोलतत नाही. केंद्र सरकारने सर्व हमीभाव वाढवलेला आहे. या सरकारने जलयुक्तची चौकशी करावी.

- काल मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. त्यातून काही दिलासा मिळालेला नाही. आता उपमुख्यमंत्री व त्यांना मदत करण्याची संधी आहे. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री यांची चित्रफीत दाखवली. कोणाच्याही मदतीची वाट न पाहता दहा कोटींची मदत केली होती.जर सरकारमध्ये इच्छाच शक्ती असेल तर मदत करता येते. आता संवेदनशील दाखवून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सगळ केंद्राकडे

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Phadanvis Critise Mahavikas Government