Beed Accident: देवीची ज्योत घेऊन जात असलेल्या भक्ताला धडक आयशर टेम्पोने धडक; युवक जागीच ठार
Accident News: बीडमध्ये तुळजापूरहून पायी ज्योत घेऊन परत येताना रामेश्वर नरवडे यांची आयशर टेम्पोने धडक देऊन जागीच मृत्यू झाला. गावकऱ्यांमध्ये हळहळ आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.
गेवराई : तुळजापूर येथून पायी ज्योत घेवून गावाकडे परत येत असताना बीडमधील गेवराईच्या खळेगावातील भक्ताला आयशरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाशी (जि धाराशिव)जवळपास घडली.