Aniket Turak
sakal
माहूर - माहूर येथे परिक्रमा यात्रेकरिता आलेल्या भाविकाचा परतीच्या प्रवासात असताना माहूर शहरातील ऐतिहासिक मातृतीर्थ तलावात पोहण्याकरिता गेलेल्या 28 वर्षीय भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तलाव हा खूप मोठा व 25 ते 30 फूट खोल पाणी असल्याने मृतदेह शोधण्यासाठी तब्बल सहा तास शोध मोहीम राबविण्यात आली.