पाचोड - खुलताबाद व छत्रपती संभाजीनगर येथून देवदर्शन घेऊन सोलापूरला परत जाणाऱ्या शिक्षक भाविकांची कार दूभाजकाला धडकल्याने स्फोट होऊन पेटून पाच जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.चार) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता. पैठण) शिवारात फौजी हॉटेलसमोर घडली असून सुरेश उटगीकर, सागर रामपुरे, तुकाराम मुचंडे, विठ्ठल शिवशेठी, बाबू पवार सर्व रा.सोलापूर असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत.