मनामनांत अवतरली पंढरी, आनंदवारी...

जांबसमर्थ : येथे आषाढी एकादशीनिमित्ताने अभंग सादर करताना पांडुरंग महाराज आनंदे व इतर. 
जांबसमर्थ : येथे आषाढी एकादशीनिमित्ताने अभंग सादर करताना पांडुरंग महाराज आनंदे व इतर. 
Updated on

जांबसमर्थ (जि.जालना) -   कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आषाढी एकादशीचा सोहळा साधेपणाने साजरा झाला. अर्थात, मनामनांत अवतरली पंढरी असेच चित्र बुधवारी (ता. एक) ठिकठिकाणी होते. 

जांबसमर्थ येथे आषाढी एकादशीनिमित्त समर्थ रामदास स्वामी मंदिर, श्रीराम मंदिर व समर्थ ज्ञानाई वारकरी शिक्षणसंस्थेत आषाढी एकादशी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

येथील श्रीराम, समर्थ मंदिर व समर्थ ज्ञानाई वारकरी शिक्षणसंस्थेत काकड आरती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियनांचे पालन करण्यात आले. मंदिराचे दरवाजे बंद होते. त्यामुळे अनेकांनी पायरीचे दर्शन घेत विठ्ठलाला मनोभावे पुजिले.

रीतिरिवाजाप्रमाणे मंदिरात श्रींना नैवेद्य दाखविण्यात आला व आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत पांडुरंग महाराज आनंदे यांच्या हस्ते पूजा पांडुरंगाची पूजा करण्यात आली. 

घनसावंगीत आषाढी एकादशी साजरी 

घनसावंगी : शहर व तालुक्‍यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी दिंडी काढून विविध देवतांच्या मंदिरात नेण्यात आल्या. शहरातील श्री नृसिंह मंदिरात दर्शनासाठी नागरिकांबरोबर महिलांनी गर्दी केली होती. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळी विविध देवतांच्या मंदिरात भजनांचे कार्यक्रम झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com